तळेगावात पार पडला राष्ट्रीय फार्मसी सप्ताह

0

इंद्रायणी महाविद्यालयाने राबविला उपक्रम
तळेगाव : तळेगांव दाभाडे परिसरातील इंद्रायणी विद्या मंदिर संचालित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च बी.फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय फार्मसी सप्ताहचे उत्साहात आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन यांनी दिली. जागतिक फार्मसी दिनानिमित्त संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर, उद्योजिका निरुपा कानिटकर, संचालक संदीप काकडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शहरातून पदयात्रा काढली. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वाईन फ्लू, डेंग्यू, टायफाईड व चिकनगुनिया या आजारांचा प्रतिबंध व काळजी या विषयावर पत्रके वाटून जनजागृती केली. तसेच मेडीकल स्टोअरमधील फार्मासिस्टचा सन्मान केला.

विविध स्पर्धांचे केले आयोजन
या फार्मसी सप्ताहात महाविद्यालयाने केमिस्टस व ड्रुगिस्ट असोसिअशनचे पदाधिकारी अध्यक्ष सुरेशशेट बाफना, कार्याध्यक्ष नेमीचंद गुंडेचा, उपाध्यक्ष गुलाबशेट गदिया आदी फार्मासिस्ट बांधवांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सप्ताहात इंडीयन फार्मसी असोसिअशन, पुणे शाखा आयोजित जिल्हास्तरीय फार्मा डीटेलिंग प्रतियोगिता महाविद्यालयात पार पडली. जिल्ह्यातील अनेक फार्मसी महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला. तसेच वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर प्रेझेन्टेशन, रांगोळी, फोटोग्राफी स्पर्धा आणि पेशंट कौन्सेलिंग स्पर्धेचे आयोजन केले गेले. प्रा. डॉ. अमोल कुलकर्णी यांचे हृदयाचे आरोग्य आणि काळजी या संदर्भात व्याख्यान झाले आणि फार्मसी सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताहाला संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे आणि खजिनदार केशवराव वाडेकर आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजानासाठी प्राचार्य डॉ. बी. बी. जैन यांनी आयोजन करणार्‍या शिक्षकांचे आणि हे आयोजन प्रत्यक्षात उतरविणार्‍या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.