तळेगाव : चार दिवसांपूर्वी पुण्याचा पारा 40 अंशावर गेला होता. त्यानंतरही थोड्या फार फरकाने तापमान चाळीस अंशांच्या आसपासच होते. शनिवारी अचानक पुणे, पिंपरी-चिंचवडच्या शहर परिसराच्या वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण झाले आहे.
पुण्याचे आज सकाळपर्यंतचे किमान तापमान 21.6 इतके नोंदवले गेले तर कमाल तापमान 39.7 अंशावर आले आहे. तसेच, तळेगावात पावसाचा हलका शिडकावा झाला. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव परिसरातील नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.