तळेगावात रविवार होणार सायकल रॅली

0

तळेगाव दाभाडे : आरोग्य संवर्धन, वाहतूक सुरक्षा जागृती, पर्यावरण संवर्धन जागृती, स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव आदी संदेश मावळ पंचक्रोशीतील जनमानसात रुजविण्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्यावतीने सायकल रॅली व लकी ड्रॉचे आयोजन केले आहे.

शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार संजय बाळा भेगडे,रश्मी कुलकर्णी, अमित गोरखे, पोलीस सहआयुक्त विनायक ढाकणे, मुख्याधिकारी वैभव आवारे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी केले. उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, उपनगराध्यक्ष सुनिल शेळके इ.उपस्थित राहणार आहेत. सकाळी मारूती मंदिर चौक येथून रॅली सुरू होणार असून सहभागी प्रत्येकास टि शर्ट देण्यात येणार आहे. तीन भाग्यवंताना लकी ड्रॉद्वारे समारंभपूर्वक सायकल वाटप करण्यात येणार आहे.