तळेगाव : रोटरी क्लब ऑफ तळेगाव-दाभाडे यांच्यावतीने येत्या रविवारी (दि.9) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे येथील अॅड. पु.वा. परांजपे विद्या मंदिरात रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या 19 वर्षांपासून मावळात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन या संस्थेमार्फत करण्यात येते. यंदाचे हे सामुदायिक विवाह सोहळ्याचे 20 वे वर्ष आहे.
या मान्यवरांची उपस्थिती
यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व नगरसेवक बापूसाहेब भेगडे, रो. अभय गाडगीळ, रो. शैलेश पालेकर, रो. रवी धोत्रे, रो. मंगेश गरोळे, रो. महेश महाजन, रो. बाळासाहेब चव्हाण, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, रो. यादवेंद्र खळदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.