तळेगाव आरोग्य केंद्र आरोग्यसेवेत सर्वोत्कृष्ठ

0

जळगाव । जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ठ आरोग्यसेवेचा डॉ.आनंदीबाई जोशी उत्कृष्ट प्राथमिक आरोग्यकेंद्र पुरस्कार चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रास देण्यात आला़ जि.प. अध्यक्षा उज्वलाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले़ यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महान, आरोग्य सभापती दिलीप पाटील, सभापती पोपटतात्या भोळे, प्रभाकर सोनवणे, सदस्य रविंद्र पाटील उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुरस्कार तळेगाव केंद्राचे डॉ़ प्रमोद सोनवणे, डॉ.आशा राजपुत व कर्मचार्‍यांना प्रदाण करण्यात आला़ यात पाच हजार रुपये रोख सन्मानचिंन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सेविकांचा सन्मान जिल्हास्तरीय सवोकृष्ठ आशा पुरस्कारात प्रथम विजया रतनसिंग जाधव, द्वितीय तमीजा युनुस तडवी यांना तर, जिल्हास्तरीय गटप्रवर्तक पुरस्कार प्रथम संगिता दिपक माळी, द्वितीय ज्योती रत्नाकर चव्हाण, तृतीय वनीता प्रविण बारी यांना देण्यात आला आहे़ त्याचप्रमाणे फ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कारात आरोग्य सेविकांमधून प्रथम विनयश्री पांडूरंग जाधव, द्वितीय शोभा शिवदास घाटे, तृतीय वैशाली तुकाराम खंडारे यांना प्रदान करण्यात आला आहे़

सहाय्यीकांचा गौरव फ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कारात आरोग्य सहाय्यीकामध्ये प्रथम राजश्री तुळशिराम पाटील, द्वितीय अरुणा गोविंद कोलते, तृतीय ललीता रमेशसिंग परदेशी, तृतीय पुष्पा रविंद्र शिनकर आणि फ्लोरेंन्स नाईटींगेल पुरस्कारात जीएनएममध्ये प्रथम कोमल राजेश आदिवाले, द्वितीय मंगल सुनील धमके, तृतीय जयश्री विष्णु वानखेडे यांना देण्यात आला आहे़