तळेगाव ढमढेरे रस्त्याचे काम केव्हा?

0

शिक्रापूर । तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील मुख्य चौकामध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आणून टाकेलेली खडी अद्यापही रस्त्याचे कडेला पडून असून या खडीचे ढीग कामाच्या प्रतीक्षेत असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

तळेगाव ढमढेरे ता. शिरूरसह याभागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली होती, यावेळी सर्वत्र सोशल मिडिया व विरोधकांनी खड्ड्यांबाबत चांगलाच धुमाकूळ घातला होता, यांनतर अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले असताना आता एकही ठिकाणी बुजेविलेले खड्डे पुन्हा मोकळे झाले आहेत, तर कित्येक ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आणलेली खडी रस्त्याचे कडेलाच पडून राहिली आहे, या रस्त्याचे कडेला टाकलेल्या खडीमुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे येथील रस्त्यांवर टाकलेली खडी बाजूला करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहे.