तळेगाव दाभाडेत आहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

0

तळेगाव दाभाडे : राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरंग कला निकेतन येथे राजमाता आहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता आहिल्याबाईच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पक्षनेते सुशील सैंदाणे, नगरसेवक अरूण भेगडे पाटील, इंदरमल ओसवाल, संग्राम काकडे, गणेश भेगडे, सचिन टकले, किशोर आवारे, भरत कोकरे, संदीप काकडे, संतोष दाभाडे, अ‍ॅड. रवींद्र दाभाडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, भरत ठाकर, युवराज पोटे, बाळासाहेब डफळ, नागेश तितर, आप्पासाहेब सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रेया कंधारेचा विशेष सन्मान
या कार्यक्रमप्रसंगी एशियन योगा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणार्‍या श्रेया शंकर कंधारे हिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिवव्याख्याते संपतराव गारगोटे यांनी आहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाबाबत प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पोटे यांनी केले. तर स्वागत प्रताप पादीर यांनी केले. आभार बापू गुंजाळ यांनी मानले.