तळेगाव दाभाडेला ज्येष्ठ नागरिकांसाठी शोभायात्रा

0

तळेगाव दाभाडे : खास गुढी पाडव्याच्या निमित्ताने तळेगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय पहिली ज्येष्ठ नागरिक कौटुंबिक शोभायात्रा अबालवृद्धांच्या सहभागात उत्साहाने पार पडली. शोभायात्रेचे नियोजन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्यासह सहकार्‍यांनी केले होते. या शोभायात्रेची सुरुवात येथील जिजामात चौकातून झाली तर समारोप ग्राम प्रदक्षिणेनंतर मारुती मंदिर चौकात करण्यात आला.

अबालवृद्धांचा सहभाग, शोभायात्रेत उंट, घाडेही
या शोभायात्रेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्यासह आजी, माजी नगरसेवक, ज्येष्ठ महिला, पुरुष, युवक, युवती, पारंपरिक वेशभूषेतील स्थानिक कलाकार, सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्थाचे सभासद तसेच बॅण्ड, भजनी मंडळे, हलगी पथक, बैलगाडी, उंट घोडे यांचा सहभाग होता. ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवहिकेचा समावेश या शोभा यात्रेत होता. आयोजन माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ यांनी केले होते. या शोभायात्रेचे स्वागत स्थानिक संस्था व मंडळांनी रांगोळी, फुलांचा वर्षाव व फटाके फोडून केले. महिलांनी घातलेले भगवे फेटे लक्ष वेधून घेत होते.