तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विलास भेगडे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश बोरुडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकार्यांच्या बिनविरोध निवड जाहीर करण्यात आल्या आहेत. नूतन कार्यकारिणी याप्रमाणे आहे.
हे देखील वाचा
अध्यक्ष-विलास भेगडे (लोकमत), उपाध्यक्ष-गणेश बोरूडे (सकाळ), सचिव-महादेव वाघमारे (प्रभात), कार्याध्यक्ष-अमीन खान (संपादक मावळ समृद्ध समाचार), खजिनदार-ऋषिकेश लोंढे (पुढारी), पत्रकार परिषद प्रमुख-प्रभाकर तुमकर (एम.पी.सी.न्युज), प्रकल्प प्रमुख-महेश भागीवंत (पुण्यनगरी), सल्लागार-विवेक इनामदार (संपादक, एम.पी.सी. न्युज), सल्लागार-रमेश जाधव गुरुजी (सकाळ), सल्लागार-गणेश वायकर (बीबीसी मराठी).