तळेगाव शहरात मानाचे पाच गणपती

0

तळेगाव दाभाडे : शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी सद्यस्थितीवर आधारित जनजागृतीपर देखावे साकारले आहेत. तसेच काही मंडळांनी यंदाही जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने देखावे, आरास पाहण्यासाठी नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने हवी तशी गर्दी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, ‘स्त्रीभ्रूण हत्या’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘पर्यावरण संवर्धन’, ‘वृक्ष लागवड’, ‘चिनी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा अंगीकार’, अशा नानाविध विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

तळेगावातील मानाचे गणपती असे
तळेगावातील पहिला मानाचा गणपती श्री डोळसनाथ महाराज तालीम मंडळाचा असून, याची स्थापना 1903 साली झाली आहे. या मंडळाने ‘स्वराज्याच्या आणाभाका’ विषयावर 22 कलाकार असलेला जिवंत देखावा सादर केला आहे. दुसरा मानाचा गणपती कालिका गणेशोत्सव मंडळाचा असून, याची स्थापना 1904 साली झाली आहे. या मंडळाने अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. तिसरा मानाचा गणपती तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असून, याची स्थापना 1902 साली झाली आहे. या मंडळाने मखरीतील गणपती देखावा सादर केला आहे. चौथा मानाचा गणपती राजेंद्र चौक गणेशोत्सव मंडळाचा असून, याची स्थापना 1906 साली झाली. या मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पाचवा मानाचा गणपती गणेश तरूण मंडळाचा असून, याची स्थापना 1902 साली झाली असून, याही मंडळाने विद्युत रोषणाई केली आहे.

जिवंत देखावे सादर करणारी गणेश मंडळे
1) जय भवानी तरूण मंडळ (ट्रस्ट) दाभाडे आळी : 16 कलाकारांचा समावेश असलेला ‘शंभु तुळजेच्या भूमीवरती पात्र असे स्त्री आदराला, शिव पिंडीवरील बिल्व दलाचे मोल नारीच्या पदराला’ देखावा. मंडळाची स्थापना 1966 साली. 2) सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ, दाभाडे आळी : 26 कलाकारांचा समावेश असलेला ‘आजच्या तरूण पिढीची वाटचाल‘ देखावा. मंडळाची स्थापना 1987 साली. 3) बनेश्वर मित्र मंडळ : 12 कलाकारांचा समावेश असलेला ‘चला हसू येऊ द्या’ देखावा. मंडळाची स्थापना 1974 साली. 4) शिवशंकर मित्र मंडळ : 10 कलाकारांचा समावेश असलेला ‘सोशल मीडियाची कथा तरुणांची व्यथा’ देखावा. मंडळाची स्थापना 1975 साली. 5) कान्होबा मित्र मंडळ, भेगडे आळी : 25 कलाकारांचा समावेश असलेला ‘स्वच्छ भारत अभियान, चायनीज मालावर बहिष्कार’ देखावा. मंडळाची स्थापना 1979 साली. 6) शिवक्रांती मित्र मंडळ : 18 कलाकारांचा समावेश असलेला ‘मोबाईलचा गैरवापर’ देखावा. मंडळाची स्थापना 1979 साली. 7) श्री छत्रपती मित्र मंडळ, भेगडे आळी : 12 कलाकारांचा समावेश असलेला ’स्वदेशी वस्तू वापरा, देश वाचवा’ देखावा. मंडळाची स्थापना 2010 साली. 8) हिंदुराज तरूण मंडळ, साने आळी : 15 कलाकारांचा समावेश असलेला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ देखावा. मंडळाची स्थापना 1988 साली.

हालते मूर्तींचे देखावे सादर करणारी गणेश मंडळे
1) जय बजरंग तरूण मंडळ, जिजामाता चौक : ‘बाणासुराचा वध’. मंडळाची स्थापना 1976 साली. 2) जिजामाता मित्र मंडळ, जिजामाता चौक : ‘साई दर्शन’. मंडळाची स्थापना 2009 साली. 3) डोळसनाथ कॉलनी मित्र मंडळ, जिजामाता चौक : ‘सूर्यमहल’. मंडळाची स्थापना 1995 साली. 4) आझाद मित्र मंडळ, खडक मोहल्ला : ‘गणेशाचा पुनर्जन्म’. मंडळाची स्थापना 1974 साली. 5) फ्रेन्डस् क्लब मित्र मंडळ, तेली आळी : ‘अंध:कासुराचा वध’. मंडळाची स्थापना 1978 साली. 6) मुरलीधर मित्र मंडळ, खळदे आळी : ‘आरिष्ठसुराचा वध’. मंडळाची स्थापना 1963 साली. 7) विशाल मित्र मंडळ, तेली आळी : ‘संत नामदेवाची भक्ती’. मंडळाची स्थापना 1990 साली.

विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करणारी गणेश मंडळे
1) भेगडे तालीम मित्र मंडळ, भेगडे आळी : मंडळाची स्थापना 1911 साली. 2) शेतकरी तरूण मंडळ, भेगडे आळी : मंडळाची स्थापना 1903 साली. 3) एकता मित्र मंडळ, राव कॉलनी. 4) मारुती मित्र मंडळ, मारुती चौक : मंडळाची स्थापना 1985 साली. 5) जय शंकर मित्र मंडळ, वैद्य कॉलनी : मंडळाची स्थापना 1996 साली. 6) अष्टविनायक मित्र मंडळ, सुभाष चौक : मंडळाची स्थापना 1984 साली. 7) कैकाडी समाज तरूण मंडळ, भेगडे आळी : मंडळाची स्थापना 1962 साली. 8) राजा शिवछत्रपती मित्र मंडळ, भेगडे आळी : मंडळाची स्थापना 1997 साली. 9) चावडी चौक मित्र मंडळ, चावडी चौक : मंडळाची स्थापना 1974 साली. 10) ज्ञानेश्वरनगर मित्र मंडळ, ज्ञानेश्वरनगर जिजामाता चौक : मंडळाची स्थापना 2011 साली. 11) धर्मवीर संभाजी मंडळ, गणपती चौक : मंडळाची स्थापना 1964 साली. 12) अमर खडकेश्वर मित्र मंडळ, खडक मोहल्ला : मंडळाची स्थापना 1951 साली. 13) जय बजरंग तरूण मंडळ (नवसाचा गणपती), राजेंद्र चौक : मंडळाची स्थापना 1974 साली. 14) शिवाजी मित्र मंडळ, कडोलकर कॉलनी : मंडळाची स्थापना 1995 साली. 15) अंबिका प्रतिष्ठान : मंडळाची स्थापना 1980 साली.