जळगाव । तळले कॉलनीतील महिलांनी परवा महापौर नितीन लढ्ढा यांची भेट घेवून त्यांच्या कॉलनीतील गटारीची समस्या मांडली होती. वारंवार तक्रार करूनही त्यांची समस्या सोडवितण्यात येत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी महापौर लढ्ढा यांनी तळले कॉलनीत येऊन प्रत्यक्ष पहाणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, प्रभारी शहर अभियंता सुनील भोळे आदींनी सकाळी 10 वाजता तळेले कॉलनीस भेट देऊन समस्या जाणून घेतली. महापौरांनी अधिकार्यांना गटारीची लेव्हल व्यवस्थित करण्याची सूचना दिली.
महिनाभरात निविदा प्रक्रीया
महापौर लढ्ढा यांनी नागरिकांना इतकी वर्ष त्रासात काढली अजून एक वर्ष हा त्रास सहन करण्याचे आवाहन केले. महिन्याभरात गटारींच्या कामाचे निविदा प्रक्रीया राबविण्यात येणार असल्याचे महापौर लढ्ढा यांनी नागरिकांना सांगितले. गटारींचे काम सुरू होत नाही तोपर्यंत जेसीबीद्वारे स्वच्छता करण्याची सूचना प्रभारी शहर अभियंत्यांना यावेळी करण्यात आल्या. महापौर लढ्ढा यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता गटारींचे लेव्हल कमी जास्त असल्याचे त्यांना आढळून आले. तिथे तिथे जेसीबीद्वारे कोरून लेव्हल करण्याची सूचना करण्यात आली. तसेच अधिकार्यांना या कामात सातत्य ठेवण्याच्या स्पष्ट सूचना महापौरांनी केल्यात. महापौर लढ्ढा यांनी पुन्हा आठ ते दहा दिवसात पहाणी येण्याचे आश्वासन नागरिकांना दिलेत.