तळोदावासीय मोकाट डुकरांमुळे त्रस्त

0

तळोदा। शहर व परिसरात मोकाट गुरांचा व डुक्करांचा वावर वाढल्याने शहरातील नागरिक व परिसरातील शेतकर्‍यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालीका प्रशासनाचे दुर्लक्ष तर तहासिलदारांकडे तक्रार करुन त्यांनी कानावर हात ठेवले असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्यरस्त्यांवर मोकाट गुरे व डुक्कर फिरत असल्यामुळे वाहानचालकांना अडचणी समोरे जावे लागत आहे. रस्त्यांवर या मोकाट गुरे व डुक्करांमुळे वाहन आजूबाजूकडून काढण्याच्या प्रयत्नातून रस्त्यांवर पदचार्‍यास धडक लागून वाद होण्याचे प्रकार घडत आहेत.

मोकाट गुरांमुळे शेती धोक्यात
शहरातील गल्लीबोळांमध्ये डूक्करांचा मुक्त संचार असल्याने रस्त्यांवर घाण होवून दूर्गंधी पसरून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मोकाट डुक्करांच्या गंभीर प्रश्नाकड़े पालीकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे. शहर डुक्कर मुक्त करण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे. तळोदा अक्ककुवा रस्त्यालगत शेती असलेल्या शेतकर्‍यांना या मोकाट गुरे व डुकरांच्या वावरामुळे आपल्या शेतांमध्ये पिके धोक्यात आले असल्याची तक्रार केली आहे.

किरकोळ अपघाताची मालिका
शेतात लावणी केलेल्या ऊस ,कापूस, सोयाबीन, केळी आदी पिकांची नासधूस मोठया प्रमाणावर करीत आहेत या मोकाट गुरे व डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी तळोदा तहसीलदार यांना लेखी निवेदनदेवून सुध्दा कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. अकंलेश्वर बर्‍हाणपूर महामार्गवर सुध्दा भरवाड लोकाची शेकडो मोकाट गुरू रस्त्यावर असता या गुरांमध्ये मोटर सायकलस्वार सापडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.