तळोदा, अक्कलकुवा क्रीडा सहविचारसभेवर बहिष्कार

0

तळोदा। तालुक्यातील क्रीडाशिक्षकांची सालाबादप्रमाणे शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन करण्यासाठी सहविचार सभा गो.हूं.महाजन शाळेत सभा नियोजित होती. मात्र सभेवर बहिष्कार टाकत तालुक्यातील क्रीडाशिक्षकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती होती. मुख्याध्यापक संघाने देखील या भूमीकेला पाठींबा जाहीर केला आहे.

यावेळी विजय पाटील, एन.बी.गोस्वावी, एड.डी.सूर्यवंशी, आर.एच.सलाउद्दीन या क्रीडा शिक्षकांनी निवेदन दिले. त्यामुळे आता तालुक्याची सभा न होता निवेदन देण्यात आले. दरम्यान शहादा, धडगांव,नवापूर, नंदुरबार येथे देखील अश्याच पद्धत्तीने निवेदन दिले जाणार आहे.

यांनी दिले निवेदन
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम, संदीप ठाकणे, महेंद्र काटे यांना निवेदन प्रत देण्यात आली. यावेळी प्रा.अजित टवाळे, गजानन काटे, सुनील मगरे, निलेश माळी, एस.व्ही.आहिरे, कमलेश मगरे, पदमेश माळी, राम सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, भूषण तडवी, एन.एन.वसावे, एस.बी.सूर्यवंशी, आर.जे. सूर्यवंशी, एन.सी.पाटील, एस.बी.पाटील, आर.के.पाडवी, एस.एम.सागर आदींनी गो.हूं.महाजन शाळेच्या प्रवेशद्वारावर निवेदन दिले.