तळोदा । तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागातील रस्ते बनवायला प्राधान्य दिले आहे मात्र नित्कृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे दलेलपूर, रापापूर ,पुनर्वसन आदी भागांच्या रस्त्याची वाट लागली असून रस्त्यात खड्डे का ? खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे.
दुचाकीही चालविणे धोक्याचे
ग्रामीण भागातील गाव पाडे तळोदा शहराला जोडलेले आहे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळून रस्ते बनवले गेले मात्र रस्त्याच्या दर्जा नित्कृष्ट असल्यामुळे रिक्षा तर सोडा साधी मोटारसायकलही चालणे धोक्याचे झाले आहे त्यातच साईडपट्टया देखील भरण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे काळात तेरावा महिना या युक्तीप्रमाणे रस्त्याची वाट लागली आहे. या रस्त्यांवरून जेमतेम वाहने मार्गक्रमण करीत आहे. अशी तक्रार वनसिंग धानका, दिलीप धानका ग्रामपंचायत सदस्य, रामजी पाडवी माजी पंचायत समिती सदस्य, दौलत बागुल, जया धानका माजी पंचायत समिती सदस्य, चुनिलाल पाडवी,साकर्या पाडवी, वनसिंग पाडवी आदी ग्रामस्थांची असून प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून केली जात आहे.