तळोदा तालुक्यातील 410 लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप

0

तळोदा। नंदुरबार जिल्हा परिषद शेष फंडातुन व समाजकल्याण मार्फत पात्र लाभार्थ्यांना, माजी मंत्री अ‍ॅड. पदमाकर वळवी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांचा हस्ते तळोदा पंचायत समितीचा आवारात विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यातील 410 लाभार्थ्यांना माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांच्या हस्ते वस्तू वाटप करण्यात आले.

विकासासाठी लाभ घ्या : यावेळी अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी सांगितले की, शासनाच्या योजनेचा लाभ आपल्या विकासासाठी करावा, ज्यांना लाभ मिळाला नसेल त्यांनी लाभ मिळविण्यासाठी अधिकार्‍यांनी ग्रामसभा घेऊन जागृती करावी. तसेच गावा गावात दारूबंदी व गुटखा बंदीचा ठराव करावा तसेच स्वच्छ भारत अभियान सर्वत्र यशस्वी पणे राबविण्यात यावे. आजचा तरुण व्यसनाधीश होत चालला आहे, त्याला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आव्हान यावेळी केले. तसेच सुहास नाईक, उमाकांत पाटील यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले तर आभार किशोर पाटील यांनी मानले.

अधिकार्‍यांची उपस्थिती
जिल्हा परिषद शेष फंडातुन व समाजकल्याण मार्फत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना ऊकझए पाईप संच, 294 लाभार्थ्यांना सौर कंदील, 10 लाभार्थ्यांना बैलजोडी, तीन अपंग पात्र लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन वाटप करण्यात आले. यावेळी सभापती शांताबाई पवार, उपसभापती दीपक मोरे, माजी सभापती आकाश वळवी, माजी उपसभापती नंदूगिर गोसावी, सीताराम राहसे, नाथा पावरा, अर्जुन वळवी, सुरेश इंद्रजित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालविकास प्रकल्प बागुल, कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील, गटविकास अधिकारी शरद मगर, बालविकास प्रकल्प अधिकारी साळवे, कक्ष अधिकारी प. स. बोरसे, विस्तार अधिकारी एस. डी. पाटील, प. स. कृषी अधिकारी के. बी. पाटील आणि तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.