तळोदा । तालुक्यातील मोड येथे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून अशा डॉक्टरांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ रेखा शिंदे नायब तहसीलदार मंगला पावरा वैद्यकीय अधिकारी संजय पटले यांचा समावेश आहे. दोन दिवासपूर्वी पथकाने तळोदा तालुक्यातील बोरद येथे देखील पथकाने भेट देवून एका डॉक्टरवर कारवाई केली आहे. तर मोड मोड येथील बसस्थानका शेजारील मातोश्री क्लिनिकचे डॉ. नंदकिशोर चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र कौन्सिल होमियोपॅथीचे पदवी प्रमाणपत्र असतांना त्यांच्याकडे अॅलापॅथीची परवानगी नसतांना अॅलोपॅथीचे औषधी आढळून आली. पथकाने डॉ. चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळोदा तालुक्यात अशा बोगस डॉक्टरांची तपासणीसाठी विशेष पथक काम करीत असून पथकाद्वारे अशा बागेस डॉक्टरांचा तपास सुरू आहे. आतपावेतो शहरासह तालुक्यात तीन बोगस डॉक्टरांवर पथकाने गुन्हा दाखल केला आहे.