तळोदा : तळोदा नगरपरिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची आणि सदस्यांची आज मंगळवारी निवड करण्यात आली.
स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष अजय छबुलाल परदेशी , उपनगराध्यक्षा तथा नियोजन व विकास समितीच्या सभापती भाग्यश्री योगेश चौधरी, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती रामानंद शिरिषकुमार ठाकरे, स्वच्छता व वैद्यकीय व सार्वजनिक समितीचे सभापती योगेश प्रल्हाद पाडवी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती शेख अमानोद्दीन फकरुद्दीन शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती अंबिका राहुल शेंडे यांची निवड करण्यात आली आहे.
नियोजन व विकास समिती सदस्यपदी हेमलाल मगरे, भास्कर मराठे, संजय माळी, गौरव वाणी यांची वर्णी लागली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सदस्यपदी शोभाबाई भोई, हेमलाल मगरे,अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय यांची वर्णी लागली आहे.
स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यपदी सुरेश पाडवी, कविता पाडवी, संजय माळी, सुभाष चौधरी यांना स्थान देण्यात आले आहे. महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी बेबीबाई पाडवी, सयना उदासी, अनिता परदेशी, कल्पना पाडवी यांची निवड झाली आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सदस्यपदी शेख अमानोद्दीन फक्रुद्दीन शेख, भास्कर दत्तू मराठे, सयना अनुपकुमार उदासी, सुभाष धोंडू चौधरी, गौरव देवेंद्रलाल वाणी या सदस्यांच्या समावेश आहे.