तळोदा नगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपाची जय्यत तयारी

0

तळोदा । नगरपालीका निवडणूक जसी जसी जवळ येते आहे. तश्या राजकीय घडमोडी देखील वेगाने घडता आहे. तळोदा नगर पालीकेत कॉग्रेसची सत्ता उलटू भाजपाची सत्ता स्थापनेसाठी भाजपने आपली कंबर कसली आहे.

शिवसेनेचे उपशहर प्रमुख सह अनेकांनी 10 सप्टेबर रोजी मुंबई स्थित रामभाऊ म्हाळगि प्रबोधनी (मीरारोड) येथे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ.उदेसिंगदादा पाडवी, जिल्हाध्यक्षा खासदार डॉ. हिना गावीत, विशेष निमंत्रित सदस्य ड़ॉ. शशिकांत वाणी,जिल्हा संघटन विस्तारक प्रा.विलास डामरे,जिल्हा चिटनीस अजय परदेशी, तालुकाध्यक्ष राजेन्द्र राजपूत, शहराध्यक्ष हेमलाल मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोद्यातील शहरातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यात योगेश प्रभाकर चौधरी, रामा ठाकरे, राजू पाडवी, नईम मंसूरी इतर तथा सेनेला सोडचिठ्ठी देत सेनेचे शहर उपप्रमुख प्रदीप शेंडे,बंटी माळी,संजय कर्णकार,मिलिंद माळी,आदिं प्रवेश घेतला. तसेच शहादा तळोदा मतदार संघात विकास कामात अग्रेसर असणारे लोकप्रनिधि आ.उदेसिंग पाडवी यांची भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी साक्री तालुका विधानसभा मतदार संघ प्रभारी नियुक्ति केली.नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.