तळोदा परिसरातील विकासकामांसाठी 5 कोटी 10 लाखांचा निधी

0

तळोदा । तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते व ग्राम विकास कामासाठी शासनाने अर्थसंकल्प 25-15 लेखाशीर्ष अंतर्गत व आदिवासी विकास निधीतुन सुमारे 5 कोटी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यात अत्यंत निकडीच्या कामांचा समावेश असून या विकास कामांना शासकीय मंजूरी मिळाली असून आज आ. उदेसिंग पाडवी यांचे हस्ते विविध ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले.

असे आहे निधीचे नियोजन
या विकास कामांमध्ये आमलपाडा ते रेटपाडा रस्ता सुधारणा (30 लाख), शेलवाई ते रतनपाडा रस्ता सुधारणा (30 लाख ), शिर्वे ते राणापूर रस्ता सुधारणा व जलनिस्सारनाची कामे (40 लाख), भवर ते बुधावल रस्ता व जलनिस्सारणाची कामे (40 लाख), नर्मदानगर ते खूषगव्हांन रस्ता सुधारणा (30 लाख ), खूष गव्हाण ते बुधावल रस्ता सुधारणा (30 लाख), सतोना ते गुजरात हद्द पर्यंत रस्ता सुधारणा(30 लाख), प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते बेडापाडा रस्ता सुधारणा (20 लाख), आ्मलाड ते बहुरूपा बावरा हद्द रस्ता सुधारणा (50 लाख), मोहिदा ते सलसाडी रस्ता सुधारणा व जलनिस्सारनाची कामे (50 लाख), उमरकुवा ते रतनपाडा रस्ता सुधारणा (40 लाख), रोझवा प्लॉट व हडांबादेवी गांव रस्ता सुधारणा (20 लाख), मौजे आमलपाडा कौंक्रिटिकरण (20 लाख), मौजे रतनपाडा कौंक्रिटिकरण करणे (20 लाख), मौजे शेलवाई कौंक्रिटिकरण करणे (20 लाख), मौजे रामपूर कौंक्रिटिकरण करणे(20 लाख ) अश्या एकूण 5 कोटी 10 लाख निधीच्या 16 विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या सर्व प्रसंगी त्या त्या गावांचे सरपंच, सदस्य तसेच, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन उदेसिंग पाडवी, सोमावलचे सरपंच संजय पाडवी, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ. रामराव आघाडे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशवंत वाडग्यात पाडवी, माजी प. स. उपसभापती सुरेश भांगा पाडवी, मोदलपाडा येथील श्यामा महाराज शहराध्यक्ष हेमालाल मगरे, ओ बी सी मोर्चा चे दीपक चौधरी, कॉन्ट्रॅक्टर राजेश हिरकण भोई, रमेश भुता भोई, संभाजी दशरथ पाटील, साहेबराव चव्हाण, चुडामन मराठे, नवनीत शिंदे, महेंद्र गाडे, संजय कलाल, बांधकाम विभागाचे उप अभियंता पी जे वळवी, श्री. वसावे, श्री. पाडवी , कांतीलाल दामा पाडवी , उदय पाडवी, प्रकाश तडवी, दिलीप पाडवी, सुदामभाई पाटील, सुरेश पाटील, आमलाड चे सरपंच सदाशिव ठाकरे , मानसिंग पाडवी , भागवत पाटील आदी उपस्थित होते.