तळोदा पालिका निवडणूकीत प्रचाराला सुरूवात करावी

0

तळोदा । भाजपाकडून तळोदा पालिकेचा सार्वत्रिक निवडणुकित नगराध्यक्ष पदाचे तिकीट कोणाला मिळेल या बाबत विविध तर्क वीतर्क लावण्यात येत असले तरी खासदार व जिल्हाध्यक्ष डॉ हिना गावीत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून 14 डिसेंबरला उमेदवारी बाबत घोषणा करतील अशी माहिती विश्‍वसनीय सूत्राकांडून समजते तूर्तास वेळ न घालता पक्षासाठी कामाला लागा असे आदेश आमदार व भाजपचे निवडणूक प्रभारी यांनी दिले असल्याचे समजते. मागील काळात तळोदा पालिका निवडणुकीत भाजपाकडून तिकीट कोणाला मिळेल यांवर बरीचशी खलबते स्थानिक पातळीवर व वरिष्ठ पातळीवर झालीत. मात्र, अंतिम निर्णय न झाल्यामुळे भाजपासाठी डोकेदुखी ठरू पाहत असणार्‍या याविषयाला बाजूला सारत आमदारांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

नगराध्यक्षपदासाठि भाजपाकडून उमेदवारी अखेर कोण करेल याबाबत अंतिम निर्णय होईल त्यावेळी होईल मात्र शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरूंन मतदार राजांची भेट तितकीच महत्वाची असल्याची भूमिका घेत उदयसिंग पाडवी यांनी उमेदवारी कोणालाही मिळाली तरी भाजपाची सत्ता स्थापनसाठी एकत्रित काम करणे गरजेचे आहे ही भूमिका घेत आमदार पाडवी यांनी याबाबत एक महत्वपूर्ण बैठक आमदार कायार्लयात घेतली. यात नगरअध्यक्षपदासाठी इछुक उमेदवार यांच्यात गोपनीय चर्चा झाली. यात उमेदवारी कोणाला मिळेल यासाठी अधिक ऊहापोह न करता प्रचारला सुरुवात होणे महत्वाचे हि भूमिका घेतली असल्याचे समजते. याबाबत दुपारी काही प्रभागात फेरी काढून मतदारंचा भेटी गाठी भाजपाकडून घेण्यात आल्या. यामतदार भेट प्रसंगी आमदार उदयसिंग पाडवी, अजय परदेशी, हेमलाल मगरे , अनुप उदासी भास्कर मराठे , महेंद्र गाढे शिरीष माळी आदि उपस्थित होते.

काँग्रेसतर्फे भेटीगाठी अगोदरपासून सुरु
दरम्यान नगराध्यक्ष व इतर उमेदवारी याबाबत काँग्रेसमध्ये कोणतेच वाद विवाद उघडपणे दिसून येत नसल्याने एक पाऊल पुढे टाकत भरत माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, प्रकाश ठाकरे, संजय माळी, अरविंद पाडवी ,हितेंद्र क्षत्रिय,पंकज राणे यांनी देखील प्रभगतील इछुक नगरसेवकांना सोबत घेवून भेटि गठि आठ दिवस पूर्वीच सूरु केल्या आहेत.