तळोदा। प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन हायस्कुल व शि. ल. माळी महाविद्यालयाचा विद्यार्थी मृणाल उदय बत्तीसे याने 12 वी च्या (विज्ञान) परीक्षेत 81.23 टक्के मिळवून केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.
तळोद्यातील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन हायस्कुल व शि. ल. माळी महाविद्यालयाचा बारावीचा विज्ञानाचा निकाल 99.74 टक्के लागला असून यात मृणाल याने 81.23 टक्के गुण मिळवून भरीव असे यश मिळविले आहे. मृणाल बत्तीसेच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन अरुणकुमार महाजन, प्राचार्य अजित टवाळे, प्रा. अमरदीप महाजन आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मृणाल याने त्यांचा यशात आई सीमा बत्तीसे, वडील उदय बत्तीसे तसेच शाळेचे सर्व शिक्षक आणि मित्रांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले आहे.
खेळासोबत अभ्यासातही प्रगती
मृणाल बत्तीसे यांची घराची आर्थिक परिस्थिती बिकट असून सुद्धा हे यश मिळविले आहे हे विशेष तसेच तो हँडबॉल खेळाचा उत्कृष्ट खेळाडू आहे. मृणाल मागचा 5 वर्षांपासून नियमित हँडबॉल खेळत असून त्याने या खेळात तीनदा राज्यस्तरीय पर्यंत प्रतिनिधित्व केले आहे आणि नियमीत अभ्यास करीत खेळाचा सराव केला तर एकाच वेळी अभ्यासात व खेळात देखील उल्लेखनीय यश मिळू शकते हे सिद्ध केले आहे