तळोदा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरुजू, शेतकरी, मजुरांना पोटभर जेवण मिळावे यासाठी महाराष्ट् शासनाचा शिवभोजन थाळी या योजनेचा शुभारंभ तळोदा येथे तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरात २ ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले असून एक केंद्र हे उपजिल्हा रुग्णालय हातोडा रोड येथे तर दुसरे तळोदा बस स्टैण्ड जवळील भंसाली प्लाझा येथे सुरु करण्यात आले आहे. यात भोजनाची वेळ सकाळी ११ ते ३ अशी ठेवण्यात आली आहे. फ़क्त ५ रुपयात ही थाळी उपलब्ध झाली आहे.त्यानुसार प्रत्येक केंद्रास् १०० थाळया उपलब्ध झाल्या आहेत. ही थाळी पार्सल सेवेत देण्यात येणार आहे. भोजनासाठी प्रथम येणाऱ्या १०० जणांना याचा लाभ घेता येणार आहे. भोजनालय दररोज निर्जन्तुक करुन घेण्याचा सुचना देण्यात आल्या.शिवभोजन केंद्र चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करुन देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.