नंदुरबार: तळोदा तालुक्यातील शिर्वे येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणावर कॉपीचा सुळसुळाट आढळून आला आहे. त्यामुळे हे केंद्र रद्द करण्यात यावे अशी शिफारस अहवालाद्वारे साहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आज मंगळवारी दहावीचा पहिलाच पेपर होता. तळोदा तालुक्यातील आदिवासी विकास विभागअंतर्गत येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला दुपारी भेट दिली. त्यात २१ ब्लॉकमध्ये तपासणी केली असता 90 टक्के विद्यार्थ्यांकडे कॉफी आढळून आली. विद्यार्थ्याजवळ पुस्तकेही आढळून आले आहेत.
परीक्षा केंद्र रहिवासी भागाजवळ मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते.