बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी ; पोलीस कर्मचार्यांद्वारे नियमाचे उल्लंघन
तहसिल कार्यालयकडे जाणार्या अरूंद रस्त्यावर वाहनचालक हॉर्न वाजवून करतात ट्रॉफीक नियंत्रण
तळोदा । शहरातील प्रमुख रस्ते अरूंद आहेत यात मोटर सायकल पार्कीग योग्य रितीने न केल्यामुळे फोरव्हील वाहनचालकांना आपले वाहन चालविणे जिकरीचे होत आहे. वाहातूक नियमाची पुरेशी माहिती नसल्यामुळे आपले वाहन कुठे व कसे पार्कीग करावे यांच्या अज्ञानामुळे नेहमीच वाहातूकीची कोंडी होत असते. याबेशिस्त वाहातूकीला लगाम लावणे आवश्यक असतांना पोलीस कर्मचार्यांकडूनच जर वाहातूक नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शहरात बेसीस्त वाहातूकीला शिस्त लावणे अवघड बनले आहे. यातच पोलीस वाहनचालकाने आडमुठे धोरण अवलंबल्याने वाहतुक कोंडी झाली होती.
पोलीस वाहनांमुळे ट्रॉफीक जाम
दोनतीन दिवसापूर्वी अशीच एक घटना घडली. यात अवजड वाहानचालकांने हॉर्न वाजवून येणार्या समोरच्या वाहानाला थांबण्याचा इशारा दिला. परंतू समोरून येणारे वाहान म्हणजे पोलीस वाहान असल्याने त्या गाडीच्याचालकाने सायरन वाजवून वाजून थांबण्यास भाग पाडले. थेट अवजड वाहनासमोर आपले वाहन आणून रस्ता बंद केला. जेमतेम मोटरसायकल तेथून पास होत होती.
पोलीस कर्मचार्यांची मुजोरी
पोलीस कर्मचारी आपल्या खाकीचा रुबाबदाखवत होता. जेव्हा नागरीक संबधित पोलीस वाहनाला मागे घ्या सांगू लागले तेव्हा पोलीस वाहनचालक वाहान मागे घेतले. नागरिकांच्य हस्तक्षेपानंतर ते धान्याने भरलेले अवजड वाहन तहसिलकार्यालयाकडे रवाना होवून रस्ता मोकळा झाला. केवळ पोलीस वाहनचालकांच्या अडमुठेपणामुळे रस्त्यांवर ट्रॉफीक जाम झाले होते. रहदारीचे नियमाचे पालन करण्यास सांगणारे जर नियमांचे उल्लंघन करीत असतील तर रहदारीचे नियम पाळण्यास आवाहन कसे करतील असा प्रश्न नागरिकांमधून केला जात होता.
अवजड वाहनांची वर्दळ
शहरातील स्मारक चौक , मनेराडवरील मारूती मंदीर परिसर, तसेच हॉटेल सत्यमच्या मागील बाजूच्या तहसिल कार्यालयाकडे जाणारा रस्ता. हया रस्त्यावर नहेमी वर्दळ असते. तहसिल कार्यालय परिसरात धान्याचे शासकीय गोदाम असल्याने नेहमीच अवजड वाहानांची येजा सुरू असते. हा रस्ता काही ठिकाणी अरूंद असल्याने त्याठीकाणी एकच वाहान पास होते. यामुळे जर रस्त्यावरून अवजड वाहान येत असेल तर संबाधित वाहानचालक हॉर्न वाजवुन समोरच्या वाहानधारकाला थांबण्याच्या इशारा करतो.