तळोदा । बसस्टॉप ते स्मारक चौक मागील दोनवर्षांपूर्वी अतिक्रम काढण्यात आले होते. त्या नंतर पालिकेने लक्ष दिले नाही त्यामुळे अतिक्रमण काढून नकाढल्या सारखे झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण होत असून वाहतुकीची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. पोलीस प्रशासन व पालिकेने लक्ष देण्याची मागणी आता वाहनधारकांमधून होत आहे.
पार्किंग झोन तरार केल्यास वाहतुकीचा प्रश्न मिटण्याची शक्यता
स्मारक चौकपासून हाकेच्या अंतरावर नगरपालिका आहे तेथूनच प्राशकीय ईमारत जवळ आहे त्या नंतर उपजिल्हा रुग्णालय व न्यायालय ही त्याच रस्तावर आहे. त्यामुळे लोकांची गर्दी जास्त असते. त्यातच भर म्हणून हातोडा पूल सुरू झाल्या पासून बसेस याच मार्गाने ये-जा करत असतात त्यामुळे आणखी जास्त वाहतुकीला अडथळे येत राहतात स्मारक चौक ते बस स्टॉप या मार्गावर किराणा दुकान, मेडिकल स्टोयर्स, हॉटेल्स, भाजी विक्रेते, हात गाडी भाजी दुकाने असल्या कारणाने मोटारसायकल रस्त्यावर उभे असतात त्यामुळे पदचार्यांसाठी मोठ्या जिकरीचे ठरत आहे. त्यातच सुसाट वेगाने वाहन चालवणार्या रोड रोमियो तर कुढलीही भान न ठेवत वेगाने मोटार सायकल मिळेल तेथे मार्ग शोधून धक्का बुक्की देत जोरात निघत असतात या साठी थानिक लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असून याच्यावर लवकर उपाय म्हणून बायपास रस्ता सुरू करण्यात यावा व अवजड वाहनांना व बसेस साठी मार्ग सोईस्कर होईल तसेच बस स्टॉप ते स्मारक चौक जवळील परिसरात लॉरी विक्रेते साठी ही पर्यायी व्यवस्था करण्यात यावी व पोलीस प्रशासनाने चार कर्मचारी नियुक्त केले असून पण ते एकाच जागी थांबतात चार कर्मचारी वेगवेगळ्या ठिकणी थांबून व नगरपालिकामार्फत वाहतूक किंवा पार्किंग झोन तयार केल्यास बर्याचसा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.