तळोदा शहरात ५५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

0

तळोदा। कोरोना विषाणुचा वाढता प्रादूर्भाव याकरिता प्रशासनाचा आदेशाने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट भरण्यासाठी आलेले बाहेर जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील गरीब नागरिकांच्या उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या संकल्पनेने व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दानशूर व्यक्तीचा लोकवर्गणीतून व नंदुरबार जिल्हा पोलीस कर्मचारी यांच्या रिवाडमधून तळोदा शहरात ५५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटण्यात करण्यात आले. यावेळी तळोदा न.प. नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस उपनिरिक्षक योगेश राऊत, अनिल गोसावी , हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे, मुकेश तावडे,पोलीस नाईक युवराज चव्हाण, सुनील पाडवी,पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकूर, सतिष गुले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबारचे कर्मचारी उपस्थित होते.