तळोदा: येथील माळी वाड़ा परिसरात वास्तव्यास असणार्या 40 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनातर्फे माळी वाड़ा परिसर कंटेन्मेंट झोन करण्याचे काम सुरु आहे. आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या. वेळीच उपचार केल्याने कोविड-19 वर मात करता येते, असा सल्ला प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.