चाळीसगाव। तालुक्यातील तळोदे शिवारातील कन्नड घाटाच्या पायथ्याशी गावठी दारू तयार करण्याची भट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे व त्यांच्या पथकाने छापा टाकला. रविवारी 11 रोजी सकाळी 8:55 वाजता छापा टाकुन तेथील गावठी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. कारवाईत एका जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भट्टी चालक आरोपी मात्र तेथून पसार झाला आहे. नुसार कन्नड घाटाच्या पायथ्याशी गावठी दारु तयार केली जात होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हवलदार शामकांत सोनवणे, पोलीस नाईक विनोद भोई, दीपक पाटील, कॉन्स्टेबल विभीषण सांगळे यांनी छापा टाकला. कारवाईत दारुचे 2 हजार लिटर कच्चे रसायन, दोनशे लिटर उकळते रसायन, 105 लिटर गावठी तयार दारुसह दोनशे लिटर च्या 12 टाक्या, 35 लिटरचे 3 बॅरल ताब्यात घेऊन जागेवर नष्ट करण्यात आले आहेत. बोढरे येथील आरोपी सुभाष विष्णू राठोड हा अड्यावरुन पसार झाला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस कॉ ज्ञानेश्वर वाघ यांचे फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हवलदार विकास वाघ करीत आहे.