तळोदा । ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य, इच्छाशक्ती, जिद्द असते. परंतु आधुनिक पायाभूत सुविधांचा अभावमुळे संधी मिळत नव्हती मागील वर्षी तालुका क्रीडा संकुल पूर्ण झाल्याने आता संधी मिळेल अशी अपेक्षा होती आहे. तळोदा तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधून तयार झाली आहे. परंतु त्याचे क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरण न झाल्यामुळे, मैदानाचे काम देखील रखडले होते, आता यास आमदार पाडवी यांच्या प्रयत्नातून अखेर हस्तांतर निश्चित झाले आहे. खेळाडुंसाठी हे संकुल खुल होणार असल्याने क्रीडापटूंना त्यांच्या हक्कांच स्थळ उपलब्ध होणार आहे.
कामांना झाला विलंब
मागील काळात संबंधित ठेकेदाराने अद्याप पावेतो संकुलाची इमारत क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरित केलेली नव्हतं, त्यामुळे उर्वरित कामास अगोदरच विलंब झाला असल्याचे बोलले जात आहे. इमारत हस्तांतरित झाल्यानंतरच क्रीडा संकुलाचा इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचे तर परिसरात खो – खो, कबड्डी आदी खेळांसाठी आवश्यक असणारे साहित्य व त्यासाठी लागणारे मैदान तयार करता येणार आहे. क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान प्राप्त होईल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ यांसारख्या इनडोअर खेळांचा प्रसार व प्रचार होईल. अस्सल ग्रामीण खेळ असलेले खो – खो, कबड्डी यांना चालना मिळेल. खेळाडूंना अद्यावत सोई सुविधा व प्रशिक्षण प्राप्त होईल आणि त्याचा त्यांना भविष्यात फायदा होईल.
खेळाडुंमध्ये उत्साह
तालुका क्रीडा संकुल परिसर सपाटीकरण असून विविध मैदान कधी तयार करण्यात आवश्यक मात्र या बाबत देखील हालचाल अपेक्षित आहे. तळोदयातील आय. टी. आय. कॉलेजचा शेजारी तालुका क्रीडा संकुलाचा बांधकामास, आमदार उदेसिंग पाडवी यांनी क्रीडा संकुलाचा निर्मितीकडे विशेष लक्ष दिले आणि आमदार उदेसिंग पाडवी यांचा प्रयत्नांतून, बघता बघता काही महिन्यातच क्रीडा संकुलाची इमारत उभी राहिली. त्यामुळे लवकरच क्रीडा संकुल तयार होवून त्याचा उपयोग खेळाडूंना घेता येईल. वर्षांपासून संकुलाचे काम पूर्ण होऊन व उद्घाटन होऊन देखील हस्तांतर तांत्रिक अडचणीमुळं अजूनही खेळाडू साठी ते अजूनही खुल करण्यात आलेले नव्हते.
किचकट अटी शर्ती
क्रीडा संकुल स्वयंसेवी संस्थाकडे एक वर्षाकरीता प्रायोगिक तत्वावर चालविण्याकरीता दयावे असे सांगितले आहे. त्यानुसार शहादा व तळोदा, तालुका क्रीडा संकुल स्वयंस्फूर्तीने चालविण्यास तयार असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या कार्यालयातून अर्ज घेवून जायचे होते मात्र किचकट अटी शर्ती व देखरेख तसेच तळोदा सारख्या भागात क्रीडापटूंसाठी आर्थिक तरतूद मोठी उपलब्ध नसल्याने या संकुलात सरावासाठी येणार्या खेळाडूंनी शुल्क कसे भरावे अथवा संस्थेने चालविण्यास घेतले तरी त्यांनी वसूल कसे करावे तसेच वीजबिल कोण भरेल? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात, यासाठी तळोदाच नाही तर नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकुलासाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा.