तळोदा । येथील वामनराव बापुजी मंगल कार्यालयात पार पडलेल्या स्वर शाहिरी विद्रोही आंबेडकरी जलसा या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शहर व तालुक्यातून पाचशेहून अधिक नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. तळोदा शहरात परिवर्तनवादी व पुरोगामी चळवळीला वळकरी मिळावी व पुरोगामी विचारधारेच्या महापुरुषांच्या वारसा जपून कार्यकर्त्यांचे संघटन निर्माण व्हावे, यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समाजसुधारकांच्या विचारांना उजाळा
या कार्यक्रमाचे उद्घाटन अभियंता वतनकुमार मगरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश इंद्रजित, जातीअंत संघर्ष समितीचे जयसिंग माळी, दलीतमित्र दादाभाई ढोदरे, अॅड.चंद्रकांत आगळे, प्रा.ए.टी. वाघ, हिरामण वाघ, भारीपचे अरुण रामराजे, उद्धव पिंपळे, गौतम धोडरे, ताराचंद साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. डी.बी.शेंडे हे होते. स्वर शाहिदी आंबेडकरी विद्रोही जलसा या कार्यक्रमाद्वारे कबीर फुले शाहू, शिवाजी महाराज, डॉ आंबेडकर, संत तुकाराम, गाडगे महाराज आदी महापुरुषांचा विचार गीतांच्या व शाहीरांच्या माध्यमातून उपस्थितांना पुढे मांडण्यात आले. कार्यक्रमाचे सादरीकरण प्रा. विकास जाधव, भीमराव खेते, राजू कोळी, मनोज नगराळे, चंद्रकांत इंगळे, दक्षा बैसाने, याच्यासह अन्य कलाकारांनी केले. राजू कोळी यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर एकपात्री प्रयोग सादर केला. अर्ध्या तासाच्या प्रबोधनाच्या त्यांनी देशातील सद्य स्थितीवर जनजागृती केली.
महिलांची लक्षणीय उपस्थिती
या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील शंभराहून अधिक महिलांची उपस्थीती होती. भारूड, वैज्ञानिक चमत्कार सादरीकरण,स्फूर्ती गीते,अभिवादन गीते, आदींचा यात समावेश होता. कार्यक्रमाचे संयोजन फुलेशह आंबेडकर विचार मंचचे डॉ प्रशांत बोबडे, मुकेश कापुरे, प्रा सुनील पिंपळे, हंसराज महाले, अमोल पाटोळे,दीपक पानपाटील, प्रा रविकांत आगळे, प्रा राजू यशोद, प्रा गौतम मोरे, प्रा निलेश गायकवाड, मुकेश कुवर,आदींनी केले होते. यशस्वीतेसाठी डॉ. डी. बी. शेंडे, डॉ. प्रशांत बोबडे,मुकेश कापुरे, प्रा. सुनील पिंपळे, हंसराज महाले, अमोल पाटोळे,दीपक पानपाटील, प्रा रविकांत आगळे, प्रा राजू यशोद, प्रा गौतम मोरे,प्रा निलेश गायकवाड,मुकेश कुवर आदींनी केले होते.