तळोदा । तळोदा पालिके मार्फत प्रथमच 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी / सीईटीचे मोफत क्लासेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे क्लासेस प्रथमच पालिकेमार्फत निशुल्क राबविले जात असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी फायदा होणार आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या क्लासेसचा फायद्या घ्यावे असे आव्हान नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी केले आहे. हे क्लास दि 24 मार्च पासून तळोदा येथे सुरू होणार आहेत.
नगराध्यक्ष अजय परदेशी यांची संकल्पना
तळोदा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या संकल्पनेतून तळोदा नगरपालिका मार्फत पहिल्यादा नवीन्य पूर्ण असा उपक्रम राबविला जात आहे. तळोदा नगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व अचीव्हर्स क्लासेस तळोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेचे मोफत आयोजन करण्यात आले असून क्लासेससाठी बाहेर गावी न जाऊ शकणार्या सामान्य घरातील विद्यार्थ्यांना या क्लासेसचा फायदा होणार आहे. आता आर्थिक ताण कमी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या मोफत क्लासेसला प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांनी अचीव्हर्स क्लासेसला संपर्क साधावा तसेच या क्लासेससाठी तळोदा शहरातील ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे त्यासाठी 23 मार्च पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे , असे आवाहन नगराध्यक्ष अजय परदेशी उपनगराध्यक्ष, भाग्यश्री चौधरी व महिला बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, मुख्याधिकारी जनार्दन पवार व अचीव्हर्स क्लासेसचे संचालक डॉ प्रदीप सोनार यांनी केली आहे.