तळोदा । शहराची वाटचाल स्वच्छता व सुंदरतेकडे सुरू असून रस्ते दुभाजक,धबधबा, कारंज्या, गटारी, रस्ते, आदींची कामे झाले असून काही ठिकाणी कामे सुरू आहेत. परंतु, शहरातील नागरिक गटारींसाठी, नळकनेक्शनासाठी चांगला रस्ता खोदून नळ कनेक्शन घेतात. परंतु, पाईप लाइन जोडणी नंतर झालेली चारी सिमेंट काँक्रीट बुजण्याचे काम संबधीहीत करीत नसल्याने रस्त्याचे बारा वाजतात तर संबंधित न.प.बांधकाम विभाग डोळे असून आंधळेची भूमिका घेत असतात. अशा लोकांना पालिकेने संबधींना त्वरीत नोटीस देणे गरजेचे असते. परंतु, पालिका कार्यवाही करत नसल्याने शहरातील चांगले रस्ते खराब होत आहेत.
विविध समस्या आजही ‘जैसे थे’
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्नही तसाच पालिका लाखो रुपये खर्च करून अतिक्रमण काढते. परंतु, काही दिवसात अतिक्रमण जैसे थे होते. परिणामी वाहूतुकीची कोंडी होऊन कर्कश हॉर्नचा आवाजाने कानठळ्या बसतात. गाड्या थांबल्याने सायलान्सरच्या धुराने आरोग्यही धोक्यात असते. पादचार्यांना जीव मुठीत ठेऊन मार्ग काढावा लागतो. वास्तविक पालिकेने दंडात्मक कार्यवाही करून अतिक्रमणधाराकांचा मालमत्तेवर खर्च टाकला पाहिजे किंवा वसुली केली पाहिजे परंतु पालीकेचा उदासीनतेमुळे वाहनधारकांना व पादचारी यांना याचा त्रास भोगावा लागत असतो. याउदासीन धोरणामुळे शहराला शिस्त लागत नाही. तर पाण्याचा बाबतीत हीच परिस्थिती शहरात आहे. एकीकडे पाण्याचा दुष्काळ तर दुसरीकडे जिवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना 2002 मध्ये बरगळल्याने शहरात पाण्याची टंचाई झाली होती. काही नगरसेवकांनी पाण्याचा राजकारणावरून ठिकठीकाणी वोअरवेल चालू केल्या. पाणी टंचाई तर संपली नाही बर्याच ठिकाणी पाण्यासाठी वणवण होते. परिणामी क्षार युक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले असून बर्याच वर्षापासून फिल्टर प्लॅन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आजतागायत फिल्टर पाणी आलेच नाही त्यामुळे फिल्टर पाणी विकत घेऊन काही सर्वसामान्य नागरिक आरोग्य सांभाळत नवीन लोकानियुक्त नगराध्यक्षांकानकडून ह्या समस्या सोडवतील अशी नागरिक अपेशीत आहेत.