तळोद्यात जनता दरबारातून समस्या सोडवू

0

तळोदा । जनता दरबार भरवून त्या माध्यमातून तळोदा वासीयांच्या समस्या सोडविल्या जातील असे आश्‍वासन आमदार उदेसिंग पाडवी यांनी आज दिले. तळोदा पालिकेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी ते बोलते होत. दरम्यान, 21 कलमी जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही आमदार पाडवी यांनी सांगितले. आज तळोदा पालिकेतील नवीन सत्ताधारी भाजप कडून आमदार कार्यालयापासून नगरसेवकांची मिरवणूक काढण्यात आली.

आमदारांच्या हस्ते सत्कार
यावेळी अरुण वडाळकर, प्रसन्नकुमार बारगळ, दत्तात्रय तांबोळी, वसंतराव मराठे, अनंत कलाल, कांतीलाल चावडा, रतीलाल भाट, वकिलाल भाट, भगवान चौधरी, समद लक्षकरी, सुकलाल पाडवी, छबुलाल परदेशी, शब्बीर पिंजारी, रशीलाबेन देसाई, विमलबाई सोनवण, रमेश पाटील, कमाबाई कुंभार, भटू शिंपी, महेश जगदाळे, एजाज उद्दीन शेख, कमल परदेशी यांचा आमदार उदेसिंग पाडवी यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी अजय छबुलाल परदेशी, नवनिर्वाचित नगरसेवक रामानंद शिरीषकुमार ठाकरे, भाग्यश्री योगेश चौधरी, बेबीबाई हिरालाल पाडवी, भास्कर दत्तू मराठे, शोभाबाई जालंदर भोई, अमानोद्दीन फखरोद्दीन शेख, सुरेश महादू पाडवी, अंबिका राहुल शेंडे, सविता नितीन पाडवी, योगेश प्रल्हाद पाडवी, सुनयना अनुपकुमार उदासी, हेमलाल मगरे, राजेश हिरकन भोई, योगेश चौधरी, अनुप उदासी, प्रदीप शेंडे, आनंद सोनार, जगदीश परदेशी, जालंधर भोई, राजू पाडवी, नितीन पाडवी, शिरीष माळी, हिरालाल पाडवी आदी उपस्थित होेते.