तळोद्यात परिवर्तन; भाजपचे अजय परदेशी विजयी

0

18 पैकी 11 जागांवर भाजपला यश
तळोदा- तळोदा नगरपालिकेत सत्तापरिवर्तन झाले असून भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय परदेशी यांनी काँग्रेसचे भरत बबनराव माळी यांचा पराभव केला. परदेशी यांना 9 हजार 208 मते मिळाली असून माळी यांना 7473 मते मिळाली आहे. 1735 मतांनी परदेशी यांनी बाजी मारली. दरम्यान, नगरसेवकपदाच्या 18 जागांपैकी भाजपने 11 जागांवर बाजी मारली असून काँग्रेसला 6 तर शिवसेनेला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागलेे. तळोदा येथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. त्यांनी पारदर्शक कारभार झाला नाही तर पालिका बरखास्तीचा इशाराही दिला होता. अखेर तळोद्यात परिवर्तन झाले व भाजपने काँग्रेसची सत्ता उधळून विजय प्राप्त केला आहे.