तळोदा – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नंदुरबार दौऱ्यावेळी तळोदा तालुक्यातील काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तळोदा येथील मनसेचे तालुका प्रमुख कल्पेश सूर्यवंशी,मनसे चे शहर प्रमुख सुरज माळी,मनसे शहर उप प्रमुख जयेश सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी,सोनू वाघ आदिनी मनसे ला राम राम करीत हाती शिवबंधन बांधले. याच बरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार यांनी कृषीमंत्री दादा भुसे,जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख विक्रात मोरे ,जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांचा प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.