तळोदा – शहरातील मुख्य रत्यावर रहात असलेल्या रहीवाशी भागात दिवस भरातून गोळा झालेला केर कचरा एका ठिकाणी गोळा केला जात आहे. हा कचरा खाण्यासाठी मोकाट गुरे तो कचरा खात आहेत. यामुळे मोकाट गुराँचा कळप,नागरी वसाहती कड़े वळल्याचे दिसून येत आहेत व मोकाट गुरांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
मोकाट गुरे शहरातील नागरी वसाहती कड़े आपले ठाण मांडत आहेत.शहरातील सर्वत्र भागात यांचा कळप दिसून येत असून वसाहतीतील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परिसरात लहान बालके विरंगगुळयासाठी सायंकाळी बाहेर पडत असतात.अश्या वेळेस मोकाट गुरे यांचा अनेकदा उच्छाद होत असून ते बालकांसह नागरिकांना जीव घेणें ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
रात कामा निमित्त येत असतात.अनेकदा मोकाट गुरे यांचा कळप मुख्य रस्त्यावर येऊन उच्छाद होत असतो.या मुळे लहान मोठे अपघात होत असतात.आणि यातच गुरांना किरकोळ जखमा झाल्याच्या घटना ही घडल्या आहेत.या मुळे पालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.मोकाट गुरांचे कळप बस स्थानक,भंसाली प्लाझा,स्मारक चौक,आदी परिसरात नेहमीच् असतात.या मुळे वाहन धारक यांना दैनंदिन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आता पालिका प्रशासन काय् कारवाई करते या कड़े लक्ष्य लागून आहे