तळोदा । शहरातील अवैध विमल गुटखा विक्री करणार्या दोन व्यपारी कडून एकूण 13 लाख 38 हजार किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्यसरकार ने बंद केलेल्या तंबाखू जन्य मसाला पुडी व नीरज जर्दाची विक्री मोठ्या प्रमाणावर होते याची दखल घेत अन्न व औषध प्रशासन धुळे यांचा मार्फत येथील रामदेव किराणा दुकान मालकाचा विमल नगर मधील एका घरातून तब्बल सात लाखाचा अवैध विमल गुटखा तर बसस्थानक रस्त्यावरील महेंद्र प्रॉव्हिजन या दुकानातून एका व्यपारी कडून दीड लाख किंमतीचा अवैध माल ताब्यात घेतला आहे
सहायक आयुक्त आनंद पवार, अन्न व औषध प्रशासन अधिकारी विभाग, धूळे यामुळे अवैध गुटखा विक्री करणार्या व्यापार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तळोदा शहर व तालुक्यात विमल गुटखा या बंदी असली तरी तळोदा अक्कलकुवा व धडगांव भागात करोडो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असते.या कार्यवाहीमुळे पून्हा एकदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या भुमीकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रामदेव प्रोव्हीजन तळोदा यांचे राहते घर ओमप्रकाश जगोर पटेल यांचे प्लॉट 10 येथे 7 लाख 48 हजार रुपयांचा विमल पान मसाला तर महेंद्र प्रोहिजन दुकानातून 5 लक्ष 90 हजार 040 रुपयांचा विमल पान मसाला, असा एकूण 13 लाख 38 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पथक लक्ष्मण दराडे सहा अन्न सुरक्षा प्रशासन, आनंद पवार अन्न सुरक्षा अधिकारी, दिनेश तांबोळी, गोपाळ कासार, तसेच नमुना सहाय्यक अधिकारी महादू गडरी आदींनी ही कार्यवाही केली.