Mandul Snake Seized At Rozoda : One Arrested रावेर : तालुक्यातील रोझोदा येथील देवेंद्र लिधुरे यांच्याकडून मांडूळ जातीचे सर्प वनविभागाने जप्त केला. बुधवार, 8 रोजी यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर, फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल आनंदा पाटील, रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीद्वारे ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रोझोद्यातील रहिवासी देवेंद्र गिरधर लिधुरे यांच्या राहत्या घरात मांडूळ सर्प लपवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती वनविभागाकडे असल्याने वरीष्ठांच्या आदेशान्वये घराची झडती घेवून मांडूळ सर्प जप्त करण्यात आला. संशयीत देवेंद्र लिधुरेविरोधात गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली.
यांचा कारवाईत सहभाग
या कारवाईत पोलिस पाटलासह रवींद्र सोनवणे, अतुल तायडे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तडवी, संभाजी सूर्यवंशी, गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, सुपडू सपकाळे, कृष्णा शेळके, युवराज मराठे, राजू बोंडल, अरुणा ढेपले,आयशा पिंजारी, सविता वाघ, वाहन चालक आनंद तेली, इमाम तडवी सचिन पाटील, विनोद पाटील आदी सहभागी झाले.