बोरद । अंकलेश्वर – बर्हाणपूर महामार्गावरील आमलाड गावाजवळ गुजरात राज्यात दारूची वाहतूक करणारा ट्राला जप्त करण्यात आला आहे. ट्रक सह सुमारे 44 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक नंदुरबार मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदूरबारच्या पथकाने केली आहे. मध्यप्रदेश राज्यातून गुजरात राज्याकडे होणार्या मद्याचा चोरट्या वाहतुकीकडे लक्ष ठेवून ट्रकला थांबविले असता त्यात कांद्याचे गोण्या आढळून आल्या. त्याच्या आड दारूचे खोके आढळले.
गुजरातमधून दारूची वाहतूक
पो.नि.अविनाश घरत यांनी तालुक्यातील आमलाड गावाजवळ एमपी 09 एचजी 6285 हे वाहन 10 चाकी ट्राला पकडला. त्यात एकूण 705 बॉक्स मद्यसाठा आढळला. त्याची किंमत 34 लाख 11 हजार 860 रुपये असून 10 लाखाचा ट्रकसह 44 लाख 44 हजार 310 रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथकाचे नंदुरबार निरीक्षक प्रकाश गौडा, अविनाश घरत, निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक सुभाष बाविस्कर, मनोज संबोधी, दु. निरीक्षक शलेंद्र मराठे, हंसराज चौधरी, धनराज पाटील, भूषण चौधरी, भट्टाचार्य बगले, हितेश जेठे, हेमंत पाटील, मानसिंग पाडवी यांनी केली.