पुणे । पुणे महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक गुरुवारी तहकूब करण्यात आली. मात्र, ही तहकूब बैठक सकाळी घ्यायची की दुपारी यावरून समितीत जोरदार वाद झाला. हा वाद सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यापर्यंत गेला. या वादावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पुणे महापालिकेची महिला व बालकल्याण समिती विविध कारणांनी सातत्याने चर्चेत आहे. या समितीची गुरुवारी बैठक होती. मात्र, माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांच्या निधनामुळे ही बैठक तहकूब करण्यात आली. ही तहकूब बैठक पुन्हा कधी घ्यायची यावरून वाद झाले. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य अर्चना पाटील यांनी बैठक सकाळी घ्यावी, असे सांगितले. त्यावर अन्य महिला सदस्यांनी ही बैठक दुपारी घ्यावी, असे सांगितले. त्यावर बहुमताने केलेल्या मागणीचा आदर राखत राणी भोसले यांनी तहकूब बैठक दुपारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यावरून या बैठकीत जोरदार वाद झाला. अखेर या वाद सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यापर्यंत गेला. या वादावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या समितीच्या एका सदस्याच्या पतिराजाची कारभारात लुडबूड वाढली आहे. त्यामुळे या समितीच्या अन्य सदस्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.