तहसिलदारांच्या आश्‍वासनानंतर उपोषण सोडले

0

बोदवड। तालुक्यातील आमदगाव येथील मागासवर्गीय भुमिहीन लोकांनी फरकांडे शिवारात अतिक्रमण जमिन 1977-87 पासून गट क्रमांक 238 कसत असून ही शेतजमिन भुमिहीन लोकांच्या नावे नियमित करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गुरचळ यांनी चार दिवसांपासून तहसिलसमोर आमरण उपोषण सुरु केले होते याची दखल घेत तहसिलदारांनी लेखी आश्‍वासन दिल्यामुळे उपोषण सोडण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणार प्रस्ताव
अतिक्रमण कायम करण्याच्या मागणीसाठी भारिपचे बाबुराव गुरचळ यांनी उपोषण सुरु केले होते. तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी पदाधिकार्‍यांना दालनात बोलवून चर्चा केली. तसेच मंडळ अधिकारी आर.टी. चौधरी हे मार्च 2017 पासून रजेवर आहेत. ते कार्यालयात हजर झालेले नाही. संपर्क साधला असता ते प्रतिसाद देत नाही. अतिक्रमण धारकांच्या अतिक्रमणाबाबत कागदपत्रांची संचयिका त्यांच्याकडे आहे. ते हजर झाल्यावर 15 ऑगस्ट पर्यंत अतिक्रमण नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविले जाती असे आश्‍वासन दिले. यावेळी नायब तहसिलदार बी.डी. वाडीले, महसूल कारकून शिरोळे, भारिप जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, तालुका युवाध्यक्ष रविंद्र सोनवणे, जयेंद्र मोरे, शहर युवा अध्यक्ष महेंद्र सुरळकर, शहराध्यक्ष भास्कर गुरचळ, आमदगाव सरपंच मनोज नांदेडे, कडू गुरचळ, राजू तायडे, बाजीराव बोदडे, विलास तायडे, पिअतम पालवे आदी उपस्थित होते.