तहसिल कार्यालयात आढावा बैठक

0

रावेर । येथील तहसील कार्यालयात मार्च एन्ड संदर्भात नुकतीच प्रांतधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. सध्या मार्च एन्ड सुरु असल्याने येथील तहसीलदारांच्या दालनात सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक पार पड़ली यात अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. यावेळी तहसीलदार विजयकुमार ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागचे इमरान शेख, मुख्याधिकारी राहुल पाटील यांसह इतर विभागचे अधिकारी तसेच मंडळ अधिकारी, तलाठी या बैठकीला उपस्थित होते.

या विषयावर झाली चर्चा
यावेळी शासकिय वसूली अनधिकृत गौण खनिज, शहरात ठिकठिकाणी अनाधिकृतपणे जाहीरात फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच शिवाय वाहनधारकांचे समोरील लक्ष हटून अपघातासारख्या घटना होत असतात. त्यामुळे अशा फलकामुळे निर्माण होणार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न, शेतसाराची वसूली तसेच संजय गांधीच्या लाभाथ्यार्र्ंनी 30 मार्च पर्यंत तर बिपीएल अंत्योदय कार्ड धारकांनी 30 जून पर्यंत आधार कार्ड जमा करावे, अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच अनधिकृत गौण खनिज संबधित तलाठीच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकार्‍यांना आढळून आल्यास थेट तलांठ्याना कारणे दाखवा नोटिस बजावून गौण खनिज संदर्भात विचारणा करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रांतधिकारी मनोज घोड़े पाटील यानी अधिकार्‍यांना सांगितले. त्यामुळे तलाठ्यांसह कर्मचार्‍यांमध्ये आपले कामकाज वेळेत पुर्ण करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.