तहसिल कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांना पीओएस मशिनचे प्रशिक्षण

0

साक्री । येथील तहसिल कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या निदर्शनाने ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या कुटूबांना कुटूंबधारकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. अशा स्वस्त धान्य दुकानदुकानादारांना ओआयसीस कंपनीच्या मशिनरींचा ओळख प प्रशिक्षण देण्यात आले. या मशिनमध्ये स्वस्त धान्या दुकादारांना मिळणारे एकूण धान्य साठा, वाटप केले धान्य, दर यांची सविस्तर माहिती आहे.

थंब केल्यावर लाभार्थ्यांला धान्य वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हा पुरवठत्त अधिकारी दत्तात्रय बोरूडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद आगरे, तहसिलदार संदिप भोसले, अप्पर तहसिलदार यशवंत सुर्यवंशी, ओयासीस कंपनीचे प्रुमुख पुरवठा अधिकारी व कर्मचरी उपस्थित होते.जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांनी या महिन्यापासूनच शिधा पत्रिकाधारकांना मिशिनीद्वारे धान्य वाटप करावे अशा सूचना दिल्यात. मशिनद्वारे वाटप करतांन काही अडचणी येत असल्यास तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.