तहसीलकचेरीजवळ झुणका भाकर केंद्रात चोरी

0

जळगाव- शहरातील तहसील कचेरीजवळ उत्तम झुणका भाकर केंद्रात भरदिवसा चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्यांनी केंद्रातील कपडे, सोन्याचे 1 ग्रॅमचे पेंडल, खाद्यपदार्थ व ड्राव्हरमधील तीन हजाराची चिल्लर असा एकूण 10 हजाराचा एैवज लंपास केला आहे.

मंगलाबाई उत्तम चौधरी यांचे तहसील कचेरीजवळ झुणका भाकर केंद्र आहे. ते मुलगा कैलास चौधरी यांच्यासह झुणका भाकर केंद्रातच राहतात. मंगलाबाई यांचे शनिपेठ परिसरात अनिल चौधरी म्हणून भाऊ राहतात. त्यांचा मुलगा हर्षल चौधरी हा केंद्राच्या कामात आत्या मंगलाबाई यांना हातभार लावतो. दोन दिवसांपासून सर्व जण नंदुरबार येथे नातेेवाईकाकडे गेले. रविवारी सकाळी कुटुंब परतले. मुलगा कैलास हा मुंबईला गेला आहे. असल्यानेय एकट्या असलेल्या मंगलबाई यांनी दुपारी झुणका भाकर केंद्र उघडले.

बैठकीहून परत आले अन् चोरी
रविवारी मंगलाबाई ह्या बैठकीला जात असतात. नेहमीप्रमाणे सायंकाळी 5 वाजता त्यांनी केंद्र बंद केले. बैठकीहून त्या 8 वाजता परत आले असता, त्यांना झुणका भाकर केंद्राचा मागच्या बाजूने लाकडी पाटी तोडलेली दिसली. केंद्र उघडले असता, सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. चोरीची खात्री झाल्यावर मंगलाबाई यांनी शनिपेठ पोलिसांना प्रकार कळविला. चोरट्यांनी मागच्या बाजूने केंद्राची लाकडी पाटी तोडून आत प्रवेश केला. केंद्रातील मंगलाबाई यांच्यासह मुलाचे कपडे, एक ग्रॅमचा सोन्याचे ओमचे पेंडल, तीन हजाराची चिल्लर तसेच केंद्रातील बिस्कीट तसेच खाद्यपदार्थ असा एकूण 10 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान चोरट्यांनी केंद्रातील पाण्याची मोटारही काढून बाहेर ठेवलेली आढळून आली. मात्र ती नेता आली नसल्याने तशीच सोडून चोरट्यांनी पोबारा केला. पोलिसांनी पाहणी केली आहे. वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा चोरी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.