पाचोरा। येथील निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा काढुन तहसिल कार्यालयातील विविध विभागामार्फत चालणार्या कामांच्या पध्दती समजुन घेतल्या. तहसिल बी.ए.कापसे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. येथील निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा तहसिल कार्यालयात कामकाजाचे आवलोकन करण्यासाठी 62 विद्यार्थ्यांनी तहसिलदार बी.ए.कापसे यांचा सत्कार केला.
तहसिलदार कापसे यांनी विद्यार्थ्यांना महसुल, संजय गांधी निराधार योजना, निवडणुक शाखा, अन्न पुरवठा शाखा, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी यांचे कामकाज, तसेच तलाठी ते कोतवालपर्यंत असलेल्या जबाबदार्या समजावुन दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांमधून तनिष्का ठाकुर, रुतुजा भोसले, अनुजा चौधरी, खुशी राठोड, कौस्तुभ पाटील, या विद्यार्थ्यांनीला अॅण्ड आर्डर, सातबारा उतारा, तहसिलदारांना करावयाचे कामकाज, तहसिलदार होण्यासाठी लागणारे शिक्षण, रेशणकार्ड व तहसिलदारांना दैनंदिन कामात येणार्या अडचणी याविषयी समस्या विचारुन त्यांच्या समस्यांचे सखोल निवारण तहसिलदार कापसे यांनी केले. यावेळी निर्मल स्कुलचे शिक्षक नंदु पाटील, चंद्रशेखर ठाकरे, नर्मदा पांडे, प्रतिक्षा परिहार उपस्थित होते.