निंभोरा- येथून जवळच असलेल्या तांदलवाडी, ता.रावेर येथील माजी आमदार राजाराम महाजन यांच्या शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने एक शेतकर्याचा मृत्यू झाला. प्रदीप वेडू महाजन (वय 50) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. 30रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान ही घटना घडली. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अमोल महाजन यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास राजू कुमावत करीत आहेत.