तांदलवाडीत दारुबंदीसाठी रणरागिणींची धडक

0

रावेर । तालुक्यातील तांदलवाडी येथे सर्रासपणे दारुविक्री केली जात असून अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. गावातील तरुण पिढी देखील दारुमुळे व्यसनाधीन होत असल्यामुळे येथील संतप्त रणरागिणींनी रविवार 3 रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत गावात दारुबंदी करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासन दिल्याने संतप्त महिला माघारी फिरल्या. रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे त्वरीत दारुबंदी करण्याची मागणी महिलांकडून होत आहे.

देशी व हातभट्टीची दारु त्वरीत कायमस्वरुपी बंद करा
रविवारी ग्रामपंचायत कार्यालयात जवळपास 100 ते 125 महिला जमा होऊन सरपंचांना याबाबत निवेदन देण्यात आले. दारूबंदीसाठी महिलांना सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच श्रीकांत महाजन यांनी दिले. तसेच 15 सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्याचे जाहीर केले. तांदलवाडी येथे देशी व हातभट्टीची दारुविक्री जोरात सुरु असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. 12 वषार्पासुन ते 60 वर्षार्पयतच्या मुला-माणसांना मद्यप्राशनाचे व्यसन आहे. त्यामुळे गावात अशांतता, भांडणे, मारामा:या व चो:यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दारूमुळे अनेक कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे. दारुच्या व्यसनात तरुण पिढी बरबाद होत आहे. दारुच्या व्यसनामुळे गावांत तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तसेच तरुणांचे दारुमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. या पुढे आणखी दारुच्या व्यसनांमुळे गैरप्रकार घडू नये म्हणून या सर्व बाबींची दखल घेऊन गावातील देशी व हातभट्टीची दारु त्वरीत कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी गावातील महिलांकडून होत आहे. यावेळी तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, उपसरपंच कविता सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील, नितीन महाजन, किरण चौधरी, आशा चौधरी, योगिता महाजन, मंजुषा पाटील, सोनाली चौधरी, वैशाली झाल्टे, वंदना तायडे, ग्रामविकास अधिकारी डी. सी. पाटील आदी उपस्थित होते.