जळगाव । तांंबापूरा परिसरातील श्रमिक वस्तीत सत्तावीसवर्षीय तरूणाची सोमवारी सकाळी अचानक प्रकृति बिघडल्याने त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकस्मिक घडलेल्या या घटनेमुळे तांबापुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तांबापूरातील रहिवासी जुबेर शेख रमजान शेख वय-27 या तरूणाची सकाळी अचानक प्रकृति बिघडली. थोडा वेळ बरे वाटेल या आशेने त्याने ती घटना गांभीर्याने घेतली नाही. खूप वेदना होऊन अस्वस्थ वाटत असल्याने त्याला मित्र शरीफ पठाण याने वाहनात बसवून तातडीने पांडे डेअरी चौकातील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीची उपचारपध्दतीचा अवलंब केला .मात्र, तपासणीअंती जुबेर शेख याला मयत घोषित केले. याप्रकरणी सीएमओ डॉ. कैलास पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आली आहे. तपास संजय पाटील हे करीत आहेत.