तांबापुरा दंगल ; 12 संशयितांना अटक, पोलीस कोठडी

0

दंगा नियंत्रण पथक ठाण मांडून ; तलवारी, लोखंडी रॉड दगडांचा वापर झाल्याने दोन्ही गटातील आठ जण जखमी ; दोन्ही गटाच्या परस्पर फिर्यादीवरुन 40 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल

जळगाव- तांबापुरा येथील गवळीवाडा परिसरात गोंधळाच्या सुरु असलेल्या कार्यक्रमात दुचाकी घालण्यावरुन वादाचे पर्यवसन दोन गटातील हाणामारी होवून दंगलीची घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. तलवार, लोखंडी रॉड व तुफान दगडफेकीमुळे यात दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचा सुरु आहेत. याप्रकरणी रविवारी परस्पर तक्रारीवरुन दोन्ही गटाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री व सोमवारी धरपकड सत्र राबवून एका गटातील 10 व दुसर्‍या गटाच्या 2 जणांना अशा एकूण 12 संशयितांना अटक केली असून इतरांचाही शोध सुरु आहे. सोमवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी प्रत्यक्ष भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणी दुसर्‍या दिवशी दंगा नियंत्रण पथकातील 17 ते 18 जवानांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनीही परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली आहे.

दोन्ही गटांविरोधात दंगलीचा गुन्हा

रविंद्र राजू हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार असे की, गवळवाडा भागात नातेवाईकांचा गोंधळाचा कार्यक्रम सुरु असताना मोनुसिंग जगदीशसिंग बावारी यानये तलवारीने जीवे मार ठार माण्याच्या उद्देशाने कपाळावर वार केला. तसेच कडू शंकर हटकर यांचे मानेवर वार केला. तसेच मोहनसिंग जगदीश सिंग बावारी, मोनुसिंग जगदीश बावरी, भोलासिंग जगदीश बावरी, जगदीशसिंह बावरी, दर्शनसिंग केमसिंग टाक, सुरेंद्रसिंग भाटीया, सदवीरसिंह बलवीरसिंह टाक सर्व रा. शिरसोली नाका, यांनी दगफेक केली. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मोनूसिंग जगदीश बावरी यानेही हटकर कुटुंबियांविरोधात फिर्याद दिली आहे. यात मी व काकाचा मुलगा सतरविंग बलवंतसिंगसह दुचाकी एम.एच 308 एफ9223 ने रामेश्‍वर कॉलनीकडे जात होतो. यादरम्यान गवळीवाड्यात पोहचल्यावर नाचत असलेल्या लोकांपैकी राहूल हटकर याने धक्का मारला. जाब विचारला असता, व त्याला लांब जावून नाच असे म्हटले असता, त्याच्यासह इतरांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बबूल हटकर याने डोक्यात लोखंडी रॉड मारुन दुखापत केली. भितीने घराकडे पळाले असता यानंतर लाठ्या काळ्या घेवून इतरांनी पाठलाग केला व घरावर दगडफेक केली. यावरुन राहूल हटकर, आकाश हटकर, विजय हटकर, गोल हटकर, भावडू उर्फ सुरंगे, बारकू हटकर, रविंद्र गर्दे, आकाश बबन हटकर, अमोल पिसे, कडू हटकर, रवि हटकर, बबूल हटकर, सागर हटकर, राकेश हटकर, भुर्‍या धोबी, दिपक हटकर, राजू हटकर, गोपाळ हटकर, संजय हटकर, प्रकाश पारधी, विशाल हटकर, कैलास गर्द, जिभाऊ हटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहेत दोन्ही गटातील जखमी
दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक तसेच मारहाणीदरम्यान लोखंडी रॉड, तलवारीचा वापर झाल्याने यात मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, मोहनसिंग बावरी, दर्शनसिंग टाक, सुरेंद्रसिंग भाटीया, सतवीरसिंग टाक व दुसर्‍या गटातील रविंद्र राजू हटकर, कडू हटकर, आकाश अशोक हटकर हे जखमी झाले असून काहींवर जिल्हा रुग्णालयता तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन्ही गटाच्या 12 संशयितांना अटक व कोठडी
आकाश अशोक हटकर (वय 22, नेहरु नगर, दत्तमंदिराजवळ) विजय राजू हटकर (वय 22, तांबापुरा), राहूल शिवाजी हटकर (वय 23), गोलू छोटू हटकर (वय 20), भावडू उर्फ भाऊसाहेब शांताराम सुरंगे (सुरंगे)(वय 23), बारकू मन्साराम हटकर (वय 23,), रविंद्र अर्जुन गर्दे, आकाश बबन हटकर (वय 23), अमोल कैलास पिसे (वय 23), कडू शंकर हटकर (वय 48) वरील सर्व रा. गवळीवाडा, तांबापुरा या एका गटातील दहा जणांसह दुसर्‍या गटाच्या जगदीशसिंह हरिसिंग बावरी रा.शिरसोली नाका, व बलविरसिंह तेजसिंग टाक वय 46 रा. देवी खदान खंडेलवाल लॉन जवळ, मंत्रनगर अकोला, ह.मु.शिरसोली नाका, तांबापुरा अशा एकूण 12 संशयितांना पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलीस निरिक्षक रजणीत शिरसाठ, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, प्रकाश निंबाळकर, निलेश पाटील, मनोज सुरवाडे, दिपक चौधरी, विजय पाटील, हेमंत कडसकर, राजू राणे, तुकाराम निंबाळकर यांनी मध्यरात्री, सकाळी अटक केली आहे. त्यांना न्या. एम.एम.चौधरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.