जळगाव : पैशांच्या वादातून दोन गटात शाब्दीक वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आल्याची घटना शहरातील तांबापूरा परीसरात रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले.
तांबापुर्यात दगडफेकीने घबराट
शहरातील तांबापूरा भागातील महादेव मंदिर परीसरात रविवार, 5 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पैशांच्या कारणावरून दोन जणांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांच्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोन्ही जणांनी आपल्या गटातील तरूणांना बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही गटातील तरूणांकडून तुफान दगडफेक व काचेच्या बाटल्या फोडल्या. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेवून परीस्थिती आटोक्यात आणली.